मराठी संगीताचा समृद्ध वारसा साजरा करण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स!
महाराष्ट्रात जशा मराठी भाषेच्या अनेक उपजाती आहेत, तसंच संगीताच्या बाबतीतही प्रचंड विविधता आहे, जसं की खानदेशी, अहिराणी, आगरी, कोळी, कोकणी, मालवणी या सर्व भाषेतली गाणी आपल्याला ऐकायला मिळतात! तसंच मराठी मध्ये 'पॉप' बरोबरच भावगीत, भक्तिगीत, लोकगीत, शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक शैलींमध्ये असंख्य गाणी दर वर्षी तयार होतात!
परंतु आजपर्यंत या विविध भाषेतील, विविध शैलीतील गीतांचं, संगीताचं, पुरस्कार रूपी कौतुक फारसं झालं नाही, हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा आम्ही मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स, हा सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं!
चित्रपट-इतर (नॉन-फिल्म) संगीत, स्वतंत्र (इंडी) कलाकार, आणि त्यांची अनोखी निर्मिती यांना हा मंच समर्पित आहे. महाराष्ट्राच्या थोर संगीत परंपरेचा, संगीतातील विविधतेचा उत्सव, नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन, आणि मराठी संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे!
चला, एकत्र येऊया, मराठी संगीताच्या या संपन्न वारसाचा गौरव करूया, आणि प्रस्थापित व नवोदित कलाकारांच्या कलेला योग्य दाद देउन त्यांचा सन्मान करूया!
AWARD CATEGORIES
RULES & REGULATIONS (नियम व अटी)
-
फक्त १ जून २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेली गाणी ग्राह्य धरली जातील - Only Songs Release from 1 June 2023 to 31 Dec 2024 will be considered for the Awards
-
फक्त चित्रपट-इतर गाणी ग्राह्य धरली जातील. चित्रपटातली गाणी ग्राह्य धरली जाणार नाहीत - Only Non-Film Songs will be considered for Awards. Film Songs will not be considered.
-
तुमची माहिती पाठवायची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२५ असेल. त्या नंतर सहभाग घेता येणार नाही - Last Date of Submitting Your Entry is 21 Jan 2025. No entry will be accepted after the deadline Date.
-
तुमचं एक गाणं असेल तर खालील फॉर्म भरा. एक पेक्षा जास्त गाणी असतील तर कृपया बाजूचं Excel Sheet Download करा व माहिती भरून कृपया registration@themima.com येथे mail करा.